नोएडा-ग्रेटर नोएडा महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार

नोएडा-ग्रेटर नोएडा महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार

नोएडा-ग्रेटर नोएडा महामार्गावर रविवारी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

ग्रेटर नोएडा नॉलेज पार्क पोलीस ठाण्याअंतर्गत परी चौक परिसरात ही घटना घडली. भरधाव व्हॅगनआर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. यात कारचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;