अल्पवयीन मुलाने चिरला आईचा गळा, बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून झाला संताप

अल्पवयीन मुलाने चिरला आईचा गळा, बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून झाला संताप

मुंबईत एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा चिरला आहे. आईच्या फोनमध्ये या मुलाने आईचे आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले. तेव्हा रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चुनाभट्टी परिसरात 9 वीत शिकणारा मुलगा घरात आईच्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता.रात्री साडे अकराच्या सुमारास गेम खेळताना या मुलाला आईच्या मोबाईलमध्ये तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि काही व्हिडीओ सापडले. त्यामुळे मलाला संताप अनावर झाला. त्याने चाकू घेतला आणि आईच्या गळ्यावर वार केले. जेव्हा मुलाने आईवर हल्ला केला तेव्हा त्याचे वडिल कामावर होते.

महिलेचा आरडाओरड ऐकून शेजारच्यांनी धाव घेतली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाने हल्ल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलाला सध्या सुधारगृहात पाठवले असून पुढील तपास सुरू ठेवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;