अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा, पण ‘ती’ आराध्याबद्दल असं काय म्हणाली?

अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा, पण ‘ती’ आराध्याबद्दल असं काय म्हणाली?

Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्याप दोघांच्या कुटुंबियांनी आणि दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसत नसल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्याची अभिनेत्री निम्रत कौर हिच्या सोबत अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

अभिषेक – निम्रत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात निम्रत हिने अभिषेक याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान निम्रत हिने आराध्या बच्चन हिच्याबद्दल वक्तव्य केलं होतं.

अभिषेक आणि निम्रत सिनेमाच्या प्रमोशनसाठी विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहोचले होते. तेव्हा कपिलने अभिषेकला एका प्रश्न विचारला. तू कधी आराध्याची अभ्यासात मदत करतो का? यावर निम्रत म्हणाली, ‘अभिषेक तिची अभ्यासात मदत नाही तर, तिचं लक्ष विचलित करत असेल…’

 

 

निम्रतच्या वक्तव्यावर अभिनेता म्हणाला, ‘अभ्यास करताना आराध्याचं लक्ष विचलित करण्याचा मी दोन – तीन वेळा प्रयत्न केला. पण ऐश्वर्या असं होऊ देत नाही….’ असं म्हणत अभिषेक याने ऐश्वर्या हिचं कौतुक केलं. ऐश्वर्या एका उत्तम आई आहे… असं देखील अभिषेक म्हणाला.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक – ऐश्वर्या यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अनेक ठिकाणी ऐश्वर्या हिला लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. पण दोघींसोबत अभिषेक कधीच नसतो. अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या एकटी लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली. तर अभिषेक पूर्ण बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचला. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण घटस्फोटाच्या चर्चांवर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;