प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईसोबत अफेअरच्या चर्चा, दोघांना हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर…

प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईसोबत अफेअरच्या चर्चा, दोघांना हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर…

बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल कायम कोणत्या न कोणत्या चर्चा रंगलेल्या असतात. ज्यामुळे सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एवंढच नाही तर, रंगणाऱ्या चर्चांमुळे सेलिब्रिटींचं घराबाहेर पडणं देखील कठीण होतं. असचं काही ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय याच्यासोबत देखील झालं होतं. राहुल रॉय यांचं स्वतःच्या आईसोबत अफेअर आहे… अशा चर्चांना उधाण आला होता. पण यावर वक्तव्य करत राहुल याने संताप व्यक्त केला होता. तेव्हा घडलेली घटना राहुल रॉय याने एका मुलाखतीत सांगितली होती.

एकदा राहुल राहुल रॉय त्याच्या मित्रांसोबत ताज हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. तेव्हा अभिनेत्याची आई देखील त्याच्यासोबत होती. राहुल रॉय म्हणाला, ‘माझ्या मित्रांसोबत मी ताजमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेलो. माझी आई देखील तिच्या मित्रांसोबत होती. तिने मला बोलावलं आणि म्हणाली चल आपण डान्स करू…’

‘दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये राहुल रॉय याला एका वृद्ध महिलेसोबत डान्स करताना स्पॉट करण्यात आलं… असं लिहिण्यात आलं. एवढंच नाही तर, त्या महिलेसोबत माझं अफेअर आहे… अशी देखील चर्चा रंगली होती.’ अशात संताप व्यक्त करत राहुल म्हणाला, नको त्या चर्चा करण्यापूर्वी माझ्या सोबत असलेली व्यक्ती कोण आहे… याची तरी खात्री करायला हवी..’ असं देखील राहुल म्हणाला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy)

 

चर्चांमुळे राहुलवर तीनवेळा हल्ला झाला होता… यावर अभिनेता म्हणाला, ‘रंगलेल्या चर्चांमुळे माझ्यावर तीन वेळा हल्ला झाला. कधी अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर, कधी रुग्णालयातून घरी पोहोचेपर्यंत माझ्या निधनाची बातमी सर्वत्र पोहोचली…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

राहुल रॉय याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक संकटांचा सामना केला. चार महिलांसोबत अफेअरनंतर राहुल याने लग्न केलं. पण अभिनेत्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर राहुल याचा घटस्फोट झाला.

राहुल रॉय याने पूजा भट्ट, मनीषा कोईराला आणि सुमन रंगनाथन या अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण आज अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे. राहुल रॉय याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात फक्त आणि फक्त राहुल रॉय याची चर्चा होती.

‘आशिकी’ सिनेमामुळे राहुल एका रात्रीत स्टार झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. ‘आशिकी’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याने 11 दिवसांत 47 सिनेमे साईन केले. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता बॉलिवूडपासून दूर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;