याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू, राहुल गांधी यांचा विश्वास

याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू, राहुल गांधी यांचा विश्वास

जातीनिहाय जनगणनेवरून देशात राजकारण सुरू असताना तेलंगणात काँग्रेस सरकारकडून बहुप्रतिक्षित जातीनिहाय जनगणना सुरु झाली आहे. यावरुन आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी देशभरातील जातिनिहाय जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची भिंत तोडू असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यानुसार, तेलंगणा सरकारने 6 नोव्हेंबर रोजी सत्तेत देशव्यापी सामाजिक-आर्थिक जातीनिहाय जनगणना सुरु केली आहे.  राहुल गांधी यांनी एक्सवर सर्वेक्षणाचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, मोदी जी, आजपासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. यामधून मिळणाऱ्या माहितीचा वापर आम्ही राज्यातील प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी धोरणे बनविण्यासाठी करणार आहोत. लवकरच ती महाराष्ट्रातही होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी पुढे लिहीले आहे की, भाजपला देशात सर्वसमावेशक जातिनिहाय जनगणना करायची नाही. मी मोदींना स्पष्ट शब्दात सांगू इच्छित आहे की, तुम्ही देशभरातील जातिनिहाय जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची भिंत तोडू असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;