महाविकास आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

महाविकास आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्याचे उद्या (रविवार) प्रकाशन करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील ड्रायटंड हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित होईल. हॉटेल ड्रायडंटमध्ये दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.

n शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात महिला, तरुण पिढी, शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह विविध घटकांना न्याय देण्याचे वचन दिले आहे तर महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली आहे. यामध्ये समाजाच्या विविध घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;