कसाराजवळ नंदीग्राम एक्सप्रेसला आग, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

कसाराजवळ नंदीग्राम एक्सप्रेसला आग, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

मुंबईवरून नांदेडला निघालेल्या नदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याची घटना आज सायंकाळी कसारा परिसरात घडली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटना स्थळी गाव घेतली आणि ही आग विझवली. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली.

नांदेडच्या दिशेने जात असलेली नंदिग्राम एक्सप्रेस आज सध्याकाळी 7च्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मिटर दूरवर एका सिग्नलला थांबली.  त्या वेळी अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगीखालून धूर यायला लागला आणि काही मिनिटांत कॉम्प्रेसरने पेट घेतला. त्यानंतर या कॉम्प्रेसरजवळ असलेली केबल पेटल्याने आगीचा भडका उडाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रवाशी गाडीतून खाली उतरले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने घटना स्थळी गाव घेतली. फायर सिलेंडरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. कॉम्प्रेसरची आग पूर्णपणे विझल्यानंतर ही गाडी इगतपुरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;