श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. सध्या कार्तिकी यात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला असून, भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, संत तुकाराम भवन, भक्तनिवास, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर उजाळून निघाले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली आहे. भाविक कळस दर्शनाबरोबरच विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. ही विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. याची जबाबदारी विभागप्रमुख शंकर मदने यांनी घेतली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टिकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाची नगरी लखलखली आहे. माय-बाप विठूरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

स्वयंसेवकांची भोजन व्यवस्था

कार्तिकी यात्रेनिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांना मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 1800 सेवेकरी काम करीत आहेत. यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील स्वयंसेवक तसेच स्वयंसेवी संस्थांकडील स्वयंसेवकांचा समावेश आहे. या स्वयंसेवकांना श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सकाळी नाश्ता, दुपारी व रात्री भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांना मोफत चहा व खिचडीवाटप सुरू करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;