‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर…’, भाजप खासदार धनंजय महाडिक यांची धमकी

‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर…’, भाजप खासदार धनंजय महाडिक यांची धमकी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं, असं नाही चालणार आज महाराष्ट्रात अनेक तांया (ताई) छाती बडवून सांगत आहेत की, आम्हाला पैसे नकोत. सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत, राजकारण करताय यांचे ? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर फोटो काढून घ्या त्यांचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडे पाठवा आम्ही व्यवस्था करतो, अशा शब्दांत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमुख मुद्दा बनविण्यात आला आहे. जाहीरनाम्यात ही महायुती सरकार निवडून आल्यानंतर दरमहा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर महाविकास आघाडी कडूनही लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपये देण्याची घोषणा वचननाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असतानाच, या योजनेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये अहंकार पसरल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी सायंकाळी फुलेवाडी येथे आयोजित केलेल्या जाहिर प्रचार सभेत बोलताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महिलांच्या बाबत अत्यंत वादग्रस्त व धमकी देणारे विधान करण्यात आले आहे. एवढेच बोलून न थांबता धनंजय महाडिक यांनी त्यापुढे जाऊनही आणखी धक्कादायक विधान केले.

जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली. दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा. खाली सही कर म्हणायचे. लगेच उद्या पैसे बंद करतो म्हणायचे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;