Maharashtra Assembly Election 2024 – महाविकास आघाडीचा रत्नागिरी शहरात प्रचाराचा झंझावात

Maharashtra Assembly Election 2024 – महाविकास आघाडीचा रत्नागिरी शहरात प्रचाराचा झंझावात

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. गद्दारांना मातीत गाडण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे.

रत्नागिरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने निवडणूक रिंगणात आहेत. सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. रत्नागिरी शहरातील रामआळी येथील बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार मोहिम राबवली. व्यापाऱ्यांना प्रचार पत्रके देत 20 नोव्हेंबरला मशाल चिन्हासमोरील बटण दाबून बाळ माने यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष मिलींद कीर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, विभागप्रमुख सलील डाफळे, प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, बिपीन शिवलकर, भाया पावसकर, प्रकाश गुरव, प्रवीण शिवलकर आणि अमित खडसोळे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;