गरोदरपणात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खाण्याचे अभिनेत्रीने सांगितले फायदे

गरोदरपणात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खाण्याचे अभिनेत्रीने सांगितले फायदे

प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगल लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने ती गरोदर असल्याची घोषणा केली होती. आता ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्याबद्दल माहिती दिली आहे. जिथे तिने नवव्या महिन्यात गाईचे दूध, गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात असल्याचा खुलासा केलाय. त्यान अनेक फायदेही तिने लिहिले आहेत. सोनाली सहगल ही अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीबद्दल उघडपणे चर्चा करत आहे. ती सतत योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने खाण्यापिण्याबाबतही सांगितले आहे. जिथे तिने तुपाचे फायदे सांगितले आहेत.

सोनाली सहगलने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे. जिथे तिने हातात तुपाचा डबा धरला आहे. यासोबत ती पंचगव्य तूप खात आहे. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे मिश्रण असते.

यासोबत सोनाली सहगलने लिहिले की, ‘हे टेस्टमध्ये चांगले नाही. पण त्याचे अनेक फायदे आहेत. हे तूप गाईचे दूध, शेण, तूप आणि मूत्र यापासून बनवले जाते. पुढच्या पोस्टमध्ये तिने पंचगव्याचा अर्थ सांगितला आणि त्याचे फायदेही सांगितलेत. याचे सेवन केल्याने मानसिक व शारीरिक शक्ती चांगली राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. असे तिने म्हटलंय.

सोनाली सहगलने 16 ऑगस्ट रोजी तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. क्यूट फोटो शेअर करत तिने सांगितले होते की ती आई होणार आहे. ते देखील डिसेंबर 2024 मध्ये बाळाचे वेलकम करणार आहे. सोनाली सहगलच्या पतीचे नाव आहे आशेष सजनानी आहे. दोघांचा जून 2023 मध्ये विवाह झाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;