कंगनानं आपली सर्वात प्रीय व्यक्ती गमावली; कुटुंब शोकसागरात बुडालं, अभिनेत्रीची इन्स्टावर भावुक पोस्ट

कंगनानं आपली सर्वात प्रीय व्यक्ती गमावली; कुटुंब शोकसागरात बुडालं, अभिनेत्रीची इन्स्टावर भावुक पोस्ट

कंगना रणौतने तिची आजी गमावली आहे. अभिनेत्रीने शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर एका इन्स्टा स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांसह ही दुःखद बातमी शेअर केली. त्याने आपल्या आजीचे फोटो शेअर केले आणि एक भावनिक संदेश लिहिला. कंगनाने लिहिले, ‘काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर जी यांचे निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कृपया प्रार्थना करा.

अभिनेत्री कंगना रणौतच्या आजीचं निधन झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कंगनाने तिच्या आजीच्या निधनाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. तीने इन्स्टाग्रामवर आपल्या आजीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोसोबत कंगनानं एक इमोशनल पोस्ट केली आहे.काल माझी आजी इंद्रायणी ठाकूर यांचं निधन झालं आहे. माझ्या कुटुंबाला हे सांगताना अतीव दु:ख होत आहे, कृपया आपण सर्वजण माझ्या आजीसाठी प्रार्थना करा असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वी माझी आजी आपल्या खोलीमध्ये साफसफाई करत असताना तीला ब्रेनस्ट्रोकचा अटॅक आला.त्यानंतर तीला कधीच उठता आलं नाही, ती या काळात ज्या स्थितीमधून जात होती, तो अनुभव तिच्यासाठी खूप वेदनादायी होता.माझ्या आजीने खूप अनुभव संपन्न असं जीवन जगलं, ती कायमच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. तीची आम्हाला कायम आठवण येत राहील.

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, माझी आजी एक प्रेरणास्त्रोत होती. तीला पाच मुलं होती. माझ्या आजीजवळ फार थोड्या वस्तू होत्या. ती फार श्रीमंत नव्हती, मात्र तरी देखील तीने हा निश्चय केला होता की आपल्या मुलांना चांगल्यातील चांगल्या संस्थांमधून शिक्षण मिळालं पाहिजे. तीने तिच्या लग्न झालेल्या मुलींना देखील नोकरी करण्याची प्रेरणा दिली. तीला आपल्या मुलांच्या करिअरचा खूप अभिमान वाटायचा असं कंगना रनौतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंगनाने म्हटलं आहे की, आम्ही सर्व कुटुंब माझ्या आजीचे आभारी आहोत. माझ्या आजीची उंची पाच फूट आठ इंच इतकी होती. एका पाहाडी महिलेसाठी ही एक मोठी गोष्ट आहे. माझी आजी इतकी उत्साही आणि आरोग्यदायी होती की 100 वर्ष वय झालं तरदेखील ती आपले सर्व कामे स्वत:च पूर्ण करायची. कंगना रनौत ही तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटात तीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;