Fruit Peels Benefits: सफरचंदासह ही 5 फळे न सोलताच खायला हवीत, जाणून घ्या सालांचे आश्चर्यकारक फायदे

Fruit Peels Benefits: सफरचंदासह ही 5 फळे न सोलताच खायला हवीत, जाणून घ्या सालांचे आश्चर्यकारक फायदे

डॉक्टर नेहमीच निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला देतात. हे आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी चांगले मानले जातात. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.

फळांच्या फायद्यांविषयी जवळपास सर्वांनाच माहिती असली तरी काही लोक असे आहेत जे फळांची साल काढून ते खातात. पण या फळांच्या सालीमध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? याचबद्दल आपण जाणून आहोत…

या 5 फळांच्या साली खाल्ल्याने होणार अनेक फायदे

1. सफरचंदाची साल

सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदय निरोगी ठेवतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. या फळाची साल खाल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते.

2. नाशपाती

या फळामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यात पुरेशा प्रमाणात फायबर असते. नाशपातीची साल काढून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक कमी होऊ शकतात, कारण नाशपातीच्या सालीमध्ये फायबर, अँटी-इंफ्लेमेटरी आणि फायटोन्यूट्रिएंट्स देखील असतात, म्हणून हे फळ नेहमी सालीसोबत खावे.

3. संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

4. चुकू

चिकुची साल आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. या फळाच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. चुकीची साल पचनासाठी फायदेशीर असते. चुकीची साल हे पोटॅशियम, लोह, फोलेट आणि पॅन्टोथेनिक ऍसिडचा प्रमुख स्त्रोत आहे.

5. किवी

किवीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते. लोक या फळाची साल काढून खातात, कारण या फळाची साल खाल्ल्याने काही लोकांच्या घशात खाज येते. पण किवी सालीसोबतच खावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;