Champions Trophy 2025 – टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, BCCI ची मोठी घोषणा

Champions Trophy 2025 – टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, BCCI ची मोठी घोषणा

हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का नाही यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना BCCI ने पुर्णविराम लावला आहे. हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तशी माहिती बीससीआयने ICC ला दिली आहे.

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे की, केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आता ‘हायब्रिड मॉडेलवर’ खेळवली जाऊ शकते. याबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेला नाही. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी हायब्रिड मॉडेल संदर्भात चर्चा करण्यास यापूर्वीच सहमती दर्शवली आहे.

ICC Champions Trophy 2025 चा रणसंग्राम 19 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आठ संघांमध्ये द्वंद्व रंगणार आहे. हिंदुस्थानसह, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाचा समावेश असून दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;