‘शक्तिमान’चं धमाकेदार कमबॅक, मुकेश खन्ना यांनी शेअर केला टीझर

‘शक्तिमान’चं धमाकेदार कमबॅक, मुकेश खन्ना यांनी शेअर केला टीझर

90 च्या दशकातील लहान मुलांची सगळ्यात आवडती मालिका शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शक्तिमानचा टीझर शेअर करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

90 च्या दशकात ‘शक्तिमान’ मालिकेने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले होते. 1997 ते 2005 या दरम्यान शक्तिमान मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. तेव्हापासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. त्यामुळे आता शक्तिमान परतणार असल्याने चाहते खूश झाले आहेत. अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्य यूट्यूब चॅनेलवरुन शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर केला आहे.

अभिनेते मुकेश खन्ना यांनी भीष्म इंटरनॅशनल या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘शक्तिमान’ परतणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच हा नवीन टीझर शेअर करताना तो परतण्याची वेळ आली आहे असे कॅप्शन दिले आहे. मुकेश खन्ना यांनी काही काळापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत कल्पना दिली होती. या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच, ‘शक्तिमान’चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. असे ते म्हणाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;