अरबाज खान याचं दुसऱ्या लग्नानंतर मोठं वक्तव्य, मलायकाबद्दल म्हणाला, ‘आजही आम्ही एकत्र कारण…’

अरबाज खान याचं दुसऱ्या लग्नानंतर मोठं वक्तव्य, मलायकाबद्दल म्हणाला, ‘आजही आम्ही एकत्र कारण…’

Arbaaz Khan: अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाला जवळपास 7 वर्ष झाली आहेत. असं असताना देखील दोघांमधील नातं आजही तितकच खास असल्याचं दिसत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अरबाज याने मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. शिवाय दोघांच्या घटस्फोटादरम्यान, मुलगा अरहान खान याने कशी सर्व परिस्थिती सांभाळली यावर देखील अरबाज खान याने मोठं वक्तव्य केलं आहे.

मुलगा अरहान खान याच्याबद्दल बोलतना अरबाज म्हणाला, ‘मलायका सोबत घटस्फोट झाल्यानंतर एका नात्यात आम्ही अडकलो आहोत आणि ते नातं म्हणजे अरहान याच्यासोबत असलेले नातं… आमच्या एकत्र अनेक आठवणी आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा मुलगा अरहान… आमच्या नात्यामध्ये काही अडथळे आले त्यामुळे मलायका आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…’ असं देखील अरबाज खान म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

मलायका अरोरा हिच्या कुटुंबासोबत असलेल्या नात्यावर देखील अरबाज याने मौन सोडलं. अभिनेता म्हणाला, ‘मलायकाच्या कुटुंबियांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अरहान याने देखील घटस्फोटानंतर सर्वकाही योग्य प्रकारे संभाळून घेतलं. आता तो मोठा होत आहे आणि सर्वकाही त्याला समजत आहे…’

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा अरबाज खान सर्वात आधी मलायका हिच्या वडिलांच्या घरी पोहोचला. तेव्हा मलायका आणि तिच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण खान कुटुंब होतं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होते.

अरबाज खान याचं दुसरं लग्न

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

 

अरबाज खान याने डिसेंबर 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान खान देखील उपस्थित होता. लग्नानंतर देखील अरहान याला अनेकदा सावत्र आईसोबत स्पॉट करण्यात आलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;