राज कुंद्राने 40 दिवसांच्या लेकीसोडून शिल्पा शेट्टीसोबत थाटला दुसरा संसार, पहिल्या पत्नीने शिल्पावर केले गंभीर आरोप

राज कुंद्राने 40 दिवसांच्या लेकीसोडून शिल्पा शेट्टीसोबत थाटला दुसरा संसार, पहिल्या पत्नीने शिल्पावर केले गंभीर आरोप

Who is Raj Kundra First Wife: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अनेक अभिनेत्यांना डेट केलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत शिल्पाचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर शिल्पा शेट्टी हिने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. राज कुंद्रा याचं शिल्पासोबत दुसरं लग्न आहे. शिल्पा सोबत दुसरं केल्यानंतर उद्योजकाच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर गंभीर आरोप केले होते. शिल्पामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला… असं देखील राज कुंद्राची पहिली पत्नी म्हणाली होती.

रिपोर्टनुसार, राज कुंद्रा याने कधीच स्वतःच्या पहिल्या बायकोबद्दल आणि मुलीबद्दल वक्तव्य केलं नाही. कारण अशी शिल्पा शिट्टी हिची इच्छा होती. पण काही जुने आर्टिकल व्हायरल झाल्यानंतर राज कुंद्राने पहिली बायको आणि मुलीबद्दल मौन सोडलं.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2009 मध्ये शिल्पा – राज यांनी खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. आज शिल्पा पती आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण शिल्पा हिच्यासोबत लग्न करण्याआधी राज याचं लग्न 2003 मध्ये कविता हिच्यासोबत झालं होतं.

कविता हिचे वडील देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत. कविता आणि राज यांचं नातं फक्त तीन वर्ष टिकलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. मुलगी फक्त 40 दिवसांची असताना कविता आणि राज यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर कविता हिने शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले.

रिपोर्टनुसार, राज कुंद्रासोबत घटस्फोट झाल्यानंतर कविता मुलीसोबत आयुष्य जगत आहे. कविता लाईमलाईट पासून दूर परदेशात वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. घटस्फोटानंतर राज एकदा देखील मुलीला भेटला नाही… असं देखील एका मुलाखतीत कविता म्हणाली.

खासगी आयुष्यावर कविता एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘आज मी शिल्पाचे फोटो माझ्या नवऱ्यासोबत पाहते, तेव्हा शिल्पा माझं आयुष्य जगत आहे… असे विचार माझ्या मनात येतात. राज माझ्यावर सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. अनेकदा मी त्याला दुसरं लग्न करायचं आहे का? असं विचारायची. पण राज कायम विषय टाळायचा… शिल्पाने माझं आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त केला आहे…’ असं देखील कविता म्हणाली होती. कविता हिने शिल्पा शेट्टी हिला स्वतःच्या घटस्फोटासाठी जबाबदार ठरवलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;