अभिजीत सावंतचा बाथरूममधील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,”आग लावलीस भावा.”

अभिजीत सावंतचा बाथरूममधील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,”आग लावलीस भावा.”

अभिजीत सावंत सोशल सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. आजकाल तो बरेच व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी अभिजीतने त्याचे हाताचे बोट बरं झाल्याचे सांगत एका हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. चाहत्यांनी त्याला काळजी घेण्यास सांगितले होते. आता अभिजीतने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो चक्क बाथरुममधील आहे.

बाथरुममधील एक डान्स व्हिडीओ

अभिजीत सावंतने त्याचा बाथरुममधील एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिजीत ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिजीतने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि शिमरी अन् काळ्या रंगाचा कोट घातलेला असून डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगलही दिसत आहे.

Abhijeet Sawant's Bathroom Dance Video Goes Viral

दरम्यान हा व्हिडीओ त्याने शोच्या आधी शेअर  केला असल्याचं त्याच्या कॅप्शनमधून समजतं. “शोच्या आधी अतिउत्साह…आणि बाथरुममध्ये सुंदर दिवे…तर मग नाच, गाणं व्हायलाच पाहिजे”,असं कॅप्शन लिहित अभिजीत सावंतने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

नेटकऱ्यांकडून डान्सचे कौतुक

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अभिजीतसाठी बिग बॉस पुन्हा बघत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अभिलाषा मोड ऑन…खूप छान…आम्हाला तुमची आठवण येतेय.” तर, एकाने लिहीलं आहे “आग लावली भावा”, अशा पद्धतीने अभिजीतचा हा डान्स पाहून चाहत्यांनी तर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Abhijeet Sawant's Bathroom Dance Video Goes Viral

नेहमी आपल्या आवाजाने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या अभिजीतने आज डान्सनेही सर्वांची मने जिंकली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 3’ च्या महाअंतिम सोहळ्यात अभिजीत पाहायला मिळणार आहे. शनिवार 9 आणि रविवार 10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;