पाकिस्तान हादरले; क्वेटा रेल्वे स्थानकातील स्फोटात 24 ठार; 46 हून अधिक जखमी
पाकिस्तान शनिवार सकाळीच भीषण स्फोटाने हादरले. प्रवाशांची वर्दळ असलेल्या क्वेटा रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. यात 24 जण ठार झाले असून 46 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने पाकिस्तान हादरले आहे.
पाकिस्तानातील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्फोट रेल्वे स्टेशनच्या बुकिंग कार्यालयात झाला. रेल्वे प्लॅटफॉर्म पोहोचताच हा स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. बॉम्ब निकामी पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
जाफर एक्सप्रेस सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पेशावरला रवाना होणार होती. याचदरम्यान स्फोटाने रेल्वे स्थानक परिसर हादरवून सोडला. प्राथमिक तपासात ही घटना आत्मघातकी स्फोटाची दिसते. मात्र याबाबत घाईने निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे एसएसपी मोहम्मद बलोच यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List