Hina Khan: कशी आहे हिना खानची प्रकृती? कोणाला मिळणार अभिनेत्रीची करोडोंची प्रॉपर्टी

Hina Khan: कशी आहे हिना खानची प्रकृती? कोणाला मिळणार अभिनेत्रीची करोडोंची प्रॉपर्टी

Hina Khan Health Update: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने अनेक मालिका आणि वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. हिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या गंभीर आजारामुळे चर्चेत आहे. हिना सध्या कर्करोगाचा सामना करत आहे. अभिनेत्रीवर उपचार सुरु आहे. हिना खान कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. गंभीर आजारावर मात करण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, हिना खान सतत सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना प्रकृतीची अपडेट देत असते. पण हिना खानला काही झालं तर तिच्या संपत्तीचा वारस कोण असेल. कुटुंबियांसोबत वाद असल्यामुळे हिना खान हिच्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क असेल… अशी चर्चा देखील जोर धरत आहे.

 

 

हिना खान हिचे कुटुंबियांसोबत वाद

हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली. हिना खान हिला अक्षरा या नावाने अधिक लोकं ओळखतात. आज हिनाला कोणात्या ओळखीची गरज नाही. पण अभिनय विश्वात पदार्पण करण्यासाठी तिच्या कुटुंबियांचा नकार होता. पण कुटुंबियांच्या विरोधात हिना खान हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. या गोष्टीचा खुलासा खुद्द हिना हिने एका मुलाखतीत केला होता. अभिनय विश्वात पदार्पण केल्यामुळे अनेक कुटुंबियांनी हिना खानसोबत असलेले संबंध देखील मोडले होते.

कोणाच्या नावावर होणार हिना खान हिची संपत्ती?

सांगायचं झालं तर, हिना खान टीव्ही विश्वातील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. फक्त मालिकाच नाहीतर, वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये देखील हिना हिने काम केलं आहे. हिना खान हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे 52 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हिना खान हिच्या कुटुंबात फक्त आई आणि लहान भाऊ आहे. काही वर्षांपूर्वी हिना खान हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे हिना खान तिची संपूर्ण संपत्ती आई आणि लहान भावाच्या नावावर करेल. हिना खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;