कार्तिकी यात्रेवर तिसऱ्या डोळ्याची नजर; मंदिर समितीच्या वतीने 120 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

कार्तिकी यात्रेवर तिसऱ्या डोळ्याची नजर; मंदिर समितीच्या वतीने 120 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शनरांग, पत्राशेड आदी ठिकाणांतील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात अशा एकूण 120 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

संबंधित ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री संत येथे असे दोन मंदिरात तुकाराम भवन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम करण्यात आले ) तयार आहेत. या नियंत्रण कक्षामध्ये 24 तास सीसीटीव्ही ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून, या यंत्रणेची जबाबदारी विभागप्रमुख राजेंद्र घागरे यांना देण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस प्रशासनाकडूनदेखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, सीसीटीव्हीरुपी तिसऱ्या होळ्याचा वॉच परिसरावर राहणार आहे.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. या सर्व भाविकांचे सुलभ व जलदगतीने दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दर्शनररांगेत घुसखोरी होऊ नये, भाविकांस काही शारीरिक त्रास झाल्यास तत्काळ आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे, कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये व इतर अनुषंगिक घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे, मंदिर, मंदिर परिसर, दर्शनरांग व इतर ठिकाणी काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास किंवा काही सूचना द्यावयाच्या असल्यास नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत होत आहे. याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयातदेखील या कॅमेऱ्यांचा अॅक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहाता येत आहेत.

भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती, त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आयपी, अनलॉक मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेला डाटादेखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. या कॅमेऱ्यांमुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून, आवश्यक ठिकाणी भाविकांना तत्काळ मदतदेखील करता येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

महिलांसाठी चेंजिंग रूम आणि हिरकणी कक्ष

विठूरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी 10 चेंजिंग रूमची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय, या चेंजिंग रूमजवळ 24 तास महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चेंजिंग रूमद्वारे एकावेळेस 30 ते 40 महिला भाविक कपडे बदलू शकतात. दर्शनरांगेत 4 ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पत्राशेड व श्री विठ्ठल सभामंडप येथे चार ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय, दर्शनमंडप येथे सॅनिटरी नॅपकीनचीदेखील उपलब्धता केली असून, ‘श्री’च्या दर्शनरांगेत महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मंदिर समितीमार्फत महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;