सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली
पश्चिम बंगालमध्ये सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. हावडा येथील नालपूर स्थानकाजवळ शनिवारी पहाटे 5.40 वाजता ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि प्रशासनाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सिकंदराबादहून शालीमारला जात असताना नालपूर स्थानकाजवळ एक्सप्रेसचे दोन डबे आणि एक पार्सल वॅन रुळावरून घसरले. दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती नाही. अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List