दीपिका पादुकोण लेकीसोबत पहिल्यांदा स्पॉट, खास व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

दीपिका पादुकोण लेकीसोबत पहिल्यांदा स्पॉट, खास व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

Deepika Padukone Spotted with Daughter Dua: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या मोठ्या पडद्यापासून दूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिका हिने 8 सप्टेंबर 2024 रोजी लेकीला जन्म दिला. दीपिका – रणवीर यांनी त्यांच्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. लेकीच्या नावाची घोषणा करत दीपिका हिने लेकीची पहिली झलक दाखवली. पण दीपिका – रणवीर यांनी लेकीसाठी ‘न फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. रणवीर – दीपिका यांनी लेकीचा चेहरा दाखवला नाही. पण त्यांच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

पहिल्या फोटोनंतर दुआ पादुकोण सिंग हिचा पहिला व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दुआ तिच्या आई – वडिलांसोबत दिसत आहे. दीपिका – रणबीर यांना लेकीसोबत कलिना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये देखील दुआचा चेहरा दिसत नाही. पण दीपिका हिला पहिल्यांदा लेकीसोबत पाहिल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

व्हिडीओमध्ये दीपिकाने लेकीला कडेवर घेतलं असून तिचा चेहरा लपवला आहे. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आमची मुलगी दुआ पादुकोण सिंग‘, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लेकीची काळजी घेताना दीपिका…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लेकीसोबत दीपिका – रणवीर कुठे गेले?’ सध्या दीपिका – रणवीर यांचा लेकीसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या लेकीच्या नावावरुन वाद

दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘दुआ पादुकोण सिंह.. दुआ : याचा अर्थ प्रार्थना. कारण ती आमच्या प्रार्थनांचं उत्तर आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलंय.’ अशी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं.

 

 

‘दुआ? एखादं हिंदू नाव नाही मिळालं का? दुआ हेच नाव का? प्रार्थना का नाही? अशा कमेंट करत अनेकांनी दीपिका – रणवीर यांना ट्रोल केलं. तर अनेकांनी ट्रोल केलं तरी काहींनी णवीर आणि दीपिकाची बाजूसुद्धा घेतली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;