शेअर बाजार पुन्हा कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद
जागतिक बाजाराला अच्छे दिन आल्यानंतरही हिंदुस्थानचा शेअर बाजार शुक्रवारी घसरला. सलग दोन दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 55.47 अंकांनी घसरून 80 हजारांच्या खाली म्हणजेच 79,486 अंकावर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 51.15 अंकांच्या घसरणीसह 45,148 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स 80 हजारांखाली आणि निफ्टी 25 हजारांखाली जाण्याची गेल्या काही दिवसांतील ही पहिलीच वेळ आहे. सेन्सेक्समधील 30 स्टॉकपैकी 23 स्टॉक घसरले, तर 7 स्टॉक फायद्यात राहिले. निफ्टीतील 50 स्टॉकपैकी 36 स्टॉकमध्ये घसरण दिसली. याआधी 7 नोव्हेंबरला सेन्सेक्स 836 अंकांच्या घसरणीसह 79,541 अंकांवर बंद झाला होता, तर निफ्टीतही 284 अंकांची मोठी घसरण झाली होती.
4,888.77 कोटी शेअर्सची विक्री
आशियाई बाजारात जपानच्या निक्केई 0.34 टक्क्यांच्या वर आहे. गुरुवारी विदेशी गुंतवणूकदार – एआयआयने 4,888.77 कोटीच्या शेअर्सची विक्री केली, तर यावेळी देशांतर्गत गुंतवणूकदार -डीआयआयने 1,786.70 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
बुधवारी शेअर बाजार बंद
20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे बुधवारी शेअर बाजार बंद ठेवला जाणार आहे. मार्केट हॉलिडेच्या लिस्टनुसार 15 नोव्हेंबरलासुद्धा शेअर बाजार बंद राहणार आहे. 15 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती आहे. त्यानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List