लालबागमध्ये आज महाराष्ट्र स्वाभिमानी सभा, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
शिवडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना -महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचारासाठी शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लालबाग मेघवाडी नाका, क्षीरसागर हाटेलजवळ ही सभा होणार आहे. या सभेकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे वरिष्ठ पदधिकारी, माजी नगरसेवक, महिला आणि पुरुष पदाधिकारी, अंगीकृत संघटना, महाविकास आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List