अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव

अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव

पती नसतानाही रेखा सिंदूर का लावतात असा प्रश्न कित्येकदा चाहत्यांनी उपस्थित केला असेल.पण रेखानंतर आता अजून एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. अविवाहित असतानाही ही अभिनेत्री कोणाच्या नावाचे सिंदूर लावते. असा प्रश्न कित्येकदा चाहत्यांनी उपस्थित केला.अखेर या अभिनेत्रीने स्वत:च व्हिडीओ बनवतं सोशल मिडीयावर याचा खुलासा केला आहे.

लग्न झाल्याच्या चर्चा

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.आता अजून एका विषयावरून ती चर्चेत आली आहे ते कारण म्हणजे अविवाहित असतानाही पवित्रा नेमकं कोणाच्या नावाचे सिंदूर लावते. एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती तिच्या भांगेत सिंदुर लावताना दिसते. त्यामुळे तिचं लग्न झालं असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं. पण जर तिचं लग्न झालं असेल तर तिचा नवरा कोण असाही प्रश्न चाहत्यांना पडत होता.

Pavitra Punia told the reason behind applying Sindoor

अखेर पवित्राने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे दिली आहेत. तसेच तिने तिच्या भांगेत सिंदुर भरण्याचे कारणही सांगितले आहे. पवित्राचे अजून लग्न झालेले नाही तरीही ती तिच्या भांगेत सिंदुर लावते.

काय म्हणाली पवित्रा?

पवित्राने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘माझ्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. मी भांगेत सिंदुर भरते, अशी चर्चा आहे. पण मला ते खूप आवडतं. जे लोकं म्हणतायत की माझं लग्न झालं आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी हे सिंदुर धार्मिक रितीने लावते. माझं लग्न झालेलं नाही. मी दोन सिंदुर लावते, ज्याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.’

Pavitra Punia told the reason behind applying Sindoor

पुढे पवित्राने म्हटलं की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, त्या दिवशी मी संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना देईन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता ठेवा. तुमचा सीट बेल्ट बांधून ठेवा. ज्या दिवशी माझं लग्न ठरेल त्या दिवशी मी सर्वांना आमंत्रण नक्की देईल.” असं म्हणत पवित्राने तिच्या भांगेतल्या कुंकाबद्दल खुलासा केला आहे. दरम्यान पवित्राचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.  तिचे उत्तर ऐकूण नेटकऱ्यांनी मात्र तिचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavitraa puniya (@pavitrapunia_)

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;