क्राईम पेट्रोल फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन, सहकलाराने केला आत्महत्येचा दावा

क्राईम पेट्रोल फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन, सहकलाराने केला आत्महत्येचा दावा

क्राईम पेट्रोल फेम अभिनेता नितीन चौहानचे गुरुवारी मुंबईत निधन झाले आहे. तो 35 वर्षांचा होता. नितिनच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. नितिनच्या सहकलाकारांनी त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नितिनचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र नितिनची माजी सहकलाकार विभूती ठाकूरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या केली असावा असा संशय व्यक्त होत आहे.

नितिन हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. नितिन ‘क्राईम पेट्रोल’सह ‘एमटीव्ही स्पिट्सव्हिल्ला’, ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘फ्रेंड्स’, ‘तेरा यार हू मै’ आदी मालिकेत काम केले आहे. दादागिरी 2 हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर नितिनला खरी प्रसिद्धी मिळाली होती. नितिन 2022 मध्ये टीव्हीवर शेवटचा दिसला होता.

नितिनची सहकलाकार विभूती ठाकूरने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत त्याच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘रेस्ट इन पीस माय डिअर. मला धक्का बसला आहे. ज्याप्रमाणे तू शरीराने सुदृढ आहेस, त्याप्रमाणे मनानेही संकटांचा सामना करायला सुदृढ हवा होतास’, असे विभूतीने म्हटले आहे. मुलाच्या निधनाची बातमी कळताच त्याचे वडील मुंबईत दाखल झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;