रील्ससाठी गोळीबार करणे महागात पडले, महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

रील्ससाठी गोळीबार करणे महागात पडले, महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

रील्ससाठी परवानाधारक पिस्तुलमधून गोळीबार करणे उत्तराखंडमधील एका महिला डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच रुद्रपूर कोतवाली पोलीस ठाण्यात महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आँचल ढिंगरा असे आरोपी महिला डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. आँचल ढिंगराने दिवाळीच्या दिवशी आपल्या फार्महाऊसवर थार गाडीजवळ आपल्या पिस्तुलमधून पाच राऊंड फायर करत रील्स बनवली. ही रील्स तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. रील्स व्हायरल होताच पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.

सदर व्हिडिओबाबत तपास सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे रुद्रपूरचे सीओ बहादूर सिंह चौहान यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;