किरकोळ वादातून पुरुषाची हत्या; बोरिवली येथील घटना

किरकोळ वादातून पुरुषाची हत्या; बोरिवली येथील घटना

किरकोळ वादातून तरुणीने आणि तिच्या प्रियकराने एकाची लाथा-बुक्यांनी मारहाण व गळ्यावर ब्लेडने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशांत पवार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. सोनी राजेशकुमार पाटील आणि रितेश चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत. कर्ज फेडण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बुधवारी सायंकाळी बोरिवली पूर्वच्या सुधीर फडके पुलाखाली एक जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. पोलिसांनी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केले. प्रशांतच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुह्याच्या तपासासाठी एक पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनी आणि रितेशला ताब्यात घेतले.

पवार आणि आरोपी हे नेहमी पुलाखाली भेटत असायचे. रितेशने पवारकडून काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे रितेशने परत केले नव्हते. त्यावरून त्याच्यात वाद होत असायचा. बुधवारी पवार पुलाखाली आला. पवारने रितेशला पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा रितेशने पैसे परत करणार नसल्याचे सांगितले. त्यावरून वाद झाल्यावर रितेश आणि सोनीने पवारला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. तसेच पवारच्या गळ्यावर ब्लेड मारून त्याला जखमी केले. त्यामुळे पवारचा मृत्यू झाला. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;