मुंबईतील अल्पवयीन मुलीवर पुद्दुचेरीत बलात्कार, आरोपी रिक्षाचालकासह तिघांना अटक

मुंबईतील अल्पवयीन मुलीवर पुद्दुचेरीत बलात्कार, आरोपी रिक्षाचालकासह तिघांना अटक

मुंबईतील 16 वर्षीय मुलीवर पुद्दुचेरी येथे सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक काजा मोहिद्दीन याला अटक केली असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह पुद्दुचेरी येथे आली होती. 30 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता आईशी भांडण झाल्यानंतर ती घराबाहेर पडली. तिने मोहिद्दीनची रिक्षा पकडली आणि एखाद्या पर्यटनस्थळी घेऊन जाण्यास सांगितले. आरोपी मोहिद्दीनने मुलीला पर्यटनस्थळाऐवजी स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिला ऑरोविल या ठिकाणी सोडून तिथून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलगी सेरेनिटी समुद्रकिनारी बसली असताना चेन्नईतील एका टेक कंपनीत काम करणाऱ्या सहा तरुणांची तिच्यावर नजर पडली. या तरुणांनी तिच्याशी मैत्री केली. पीडित मुलीने चेन्नईला मित्राच्या घरी जायचे असल्याचे सांगितले. या मुलांनी तिला चेन्नईला सोडण्याचे आश्वासन देऊन स्वतःच्या हॉटेलवरील रूमवर नेले. तिला मद्य पिण्यास देऊन सहा जणांनी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर 2 नोव्हेंबरला टॅक्सीतून तिला पुन्हा पुद्दुचेरीला सोडले.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पीडितेच्या आईने ग्रँड बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पुद्दुचेरी येथील बीच रोडवर मुलगी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्या वेळी पीडित मुलीची अवस्था अतिशय वाईट होती आणि तिला काहीही बोलता येत नव्हते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाल विकास समितीच्या सदस्यांनी तिला विश्वासात घेऊन प्राथमिक चौकशी सुरू केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;