आदित्य ठाकरे यांच्या आज नांदगाव, देवळाली, नाशिक पश्चिममध्ये जाहीर सभा

आदित्य ठाकरे यांच्या आज नांदगाव, देवळाली, नाशिक पश्चिममध्ये जाहीर सभा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे शुक्रवारी, 8 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदगाव, देवळाली, नाशिक पश्चिम मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

नांदगावमधील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ दुपारी दोन वाजता निमगाव येथे आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. देवळालीतील शिवसेना उमेदवार योगेश घोलप यांच्या प्रचारासाठी सायंकाळी साडेपाच वाजता देवळाली पॅम्पच्या जुने बसस्टॅण्डजवळ जाहीर सभा होईल. नाशिक पश्चिमचे शिवसेना उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ सिडकोतील पवननगर येथे साडेसहा वाजता सभा होत आहे. यावेळी उपनेते सुनील बागुल, खासदार राजाभाऊ वाजे, विनायक पांडे, माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड, अपूर्व हिरे, वसंत गीते, बबन घोलप, तानाजी जायभावे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, आकाश छाजेड, गजानन शेलार, नाना महाले, केशवअण्णा पाटील, लक्ष्मण जायभावे हजर राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;