राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी भाजप त्यांच्यावर खोटय़ा केसेस टाकतोय

राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी भाजप त्यांच्यावर खोटय़ा केसेस टाकतोय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशातील जनसामान्यांचा आवाज बनले आहेत. सामान्यांचा आवाज ते देशभर पसरवत आहेत. त्यामुळेच त्यांचे तोंड बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर खोटय़ा केसेस दाखल करतेय, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करत भाजपला मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांना नक्षल समर्थक असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांना खोटय़ा प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. त्यांच्यामागे सीबीआय चौकशी लावून त्यांना महाराष्ट्रात प्रचार करता येणार नाही असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र राहुल गांधी घाबरणारे नेते नाहीत, असे पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;