धक्कादायक! महाराष्ट्रात तीन तासाला एक शेतकरी संपवतो जीवन

धक्कादायक! महाराष्ट्रात तीन तासाला एक शेतकरी संपवतो जीवन

महाराष्ट्रात तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाकर आहे, ही शिंदे-भाजपा सरकारची कामगिरी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱया धोकेबाज क खोकेबाज सरकारचे शेवटचे पंधरा दिवस राहिले असून 23 तारखेला हे सरकार पायउतार होईल, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी आज केली. टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे-भाजप सरकारने पुणे रिंग रोड, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, रुग्णवाहिका खरेदी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा लुटला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी फार मोठी आहे. या सरकारने महाराष्ट्रात येणारे नेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज प्रकल्प यासारखे तब्बल 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प गुजरात व इतर राज्यात जाऊ दिले. यामुळे महाराष्ट्रातील 10 लाख रोजगार हिरावले व सुशिक्षित तरुण बेरोजगारच राहिले. भाजप ‘बहुत झुठी पार्टी’ असून या पक्षाचे नरेंद्र मोदींपासून खालपर्यंत सर्वच जण सातत्याने खोटे बोलत असतात, असेही ते म्हणाले.

भाजपकडून जनतेची दिशाभूल

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणात दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली नाही अशा खोटय़ा जाहिराती भाजपने वर्तमानपत्रातून दिल्या आहेत. काँग्रेस विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही पवन खेरा यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;