मीरा रोडमध्ये शस्त्र तस्कराला बेडय़ा

मीरा रोडमध्ये शस्त्र तस्कराला बेडय़ा

चार गावठी पिस्तूल. आठ जिवंत काडतुसांसह शस्त्रास्त्र तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा रोडमध्ये बेडय़ा ठोकल्या आहेत. परमानंद म्हात्रे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वेस्टर्न हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःजवळ बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये धाड टाकली. ही कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;