Jet Airways: जेट एअरवेज इतिहासजमा होणार! एअरलाइन्सची मालमत्ता विकणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Jet Airways: जेट एअरवेज इतिहासजमा होणार! एअरलाइन्सची मालमत्ता विकणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाची आशा आता मावळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जेट एअरवेजचे लिक्विडेशनचे (मालमत्ता विकण्याची प्रक्रिया) आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा (NCLT) तो निर्णयही रद्द केला, ज्यामध्ये जेट एअरवेजची मालकी जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमकडे (JKC) हस्तांतरित करण्याच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने लिक्विडेटर नेमण्याच्या दिल्या सूचना

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले, जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) 5 वर्षांच्या मंजुरीनंतरही रिझोल्यूशन प्लॅनची ​​अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्याने जेट एअरवेजच्या कर्जदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लिक्विडेशन करण्यात यावं.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मुंबईला लिक्विडेटरच्या नियुक्तीसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने कर्जदारांना 150 कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG) इनकॅश करण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, नरेश गोयल यांच्या नेतृत्वाखालील जेट एअरवेज ही एकेकाळी देशातील प्रमुख विमान कंपनी होती. जेट एअरवेजचा पडका काळ 2019 पासूनच सुरु झाला असून कंपनीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यानंतर नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने (NCLAT) जेट एअरवेजचे मालकी हक्क यूके येथील कॅलरॉक कॅपिटल आणि युएई येथील उद्योजक मुरारी लाल जालान यांच्या कन्सोर्टियमकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;