Shah Rukh Khan Threat: अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’

Shah Rukh Khan Threat: अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’

After Salman Khan Shah Rukh Khan receives death threat: बॉलीवुड अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. सलनान खानला धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे समोर आले. त्यानंतर आणखी एका बॉलीवुड अभिनेत्यास धमकी आली आहे. हा अभिनेता किंग खान म्हणून ओळखला जातो. किंग खान म्हणजेच आता शाहरुख खानला धमक्या मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता शाहरुखचे कोणतेही चाहते मन्नतच्या जवळ येऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत.

काय आहे धमकी प्रकरण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात फोन केला. त्याने म्हटले की, शाहरुख याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला ठार करीन, असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलते ठेवले. त्याचे नाव काय आहे, असे विचारले. मात्र तो व्यक्ती अधिकच हुशार निघाला. शाहरुखला धमकीचे कॉल कॉलर म्हणाला, मी कोण आहे हे तो सांगत नाही, तुला लिहायचे असेल तर माझे नाव ‘हिंदुस्थानी’ लिहा. वांद्रे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा एफआयआर दाखल केला आहे.

बॉलीवूडमधील दुसऱ्या अभिनेत्यास धमकी

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. बाबा सिद्दिकी यांनी सलमान खानला मदत केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले. या प्रकरणानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहरुख यालाही धमकीचा फोन आला आहे. आता या धमकीमागे कोण आहे? हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.

बॉलीवूडमध्ये धमक्या येऊ लागल्या आहे. यामुळे चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. शाहरुखसंदर्भात फोन करणारा व्यक्ती छत्तीसगडमधील असल्याचे तपासातून समोर आले आहे. फजिया खान नावाचा हा व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;