भाजपने डॉग स्क्वाड बागळलेत; जयंत पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला

भाजपने डॉग स्क्वाड बागळलेत; जयंत पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला

रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणावर वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत यांचे विधान दुर्दैवी आहे. त्यांच्यासारखी माणसे, डॉग स्क्वॉड भारतीय जनता पक्षाने बाळगले आहेत. याला देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे का? असा खडा सवाल जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे खुलासा मागितला आहे.

सदाभाऊ खोत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रायश्चित्त करावे लागेल. भाजपमधील काही लोक शरद पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात आणि आमदारकी मिळवतात. भाजपचा हा विचार त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये फडणवीसांना भांगेची रोपटी लावली; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवारांनीही व्यक्त केली नाराजी

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या विधानावर महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. सदाभाऊ खोत यांचे विधान निषेधार्ह असून त्यांना यासंदर्भात फोनही केला. हे विधान मला अजिबात आवडलेले नाही. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणे योग्य नाही, असे त्यांना सुनावल्याचे अजित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;