सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड सुपर स्टार सलमान खान आधीच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मात्र, तरीही अलीकडे सलमान खानला बऱ्याच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानला सुद्धा धमकी मिळाली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनवरुन शाहरुखला ही धमकी मिळाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शाहरुखच्या धमकी प्रकरणात छत्तीसगड रायपूर कनेक्शन आढळून आलं आहे. तिथे राहणाऱ्या फैझान नावाच्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला होता. मुंबई पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी रायपूरला गेली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहरुख खानच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

…म्हणूनच चाहत्यांना भेटला नाही

पठाण आणि जवानच्या यशानंतर धमक्या मिळाल्याच मागच्यावर्षी शाहरुखने म्हटलं होतं. ऑक्टोंबर 2023 मध्ये शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणामुळेच शाहरुख खान यावर्षी त्याच्या बर्थ डे ला मन्नत बंगल्याबाहेर जमलेल्या त्याच्या चाहत्यांना भेटला नव्हता, असा दावा करण्यात येतोय.

सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक

सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानला धमकी देणाऱ्या एका तरूणाला अखेर अटक करण्यात आली आहे. विक्रम असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. पोलिसांनी कर्नाटकमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;