सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खाननंतर आता बॉलीवूड किंग शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुखच्या कार्यालयात धमकीचा फोन करण्यात आला होता. हा फोन रायपूरमधून करण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, फैजान खान नामक व्यक्तीने शाहरुखची प्रोडक्श कंपनी रेड चिलिजच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली. पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता रायपूरमधून सदर फोन आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ रायपूरला दाखल झाली. रायपूरमध्ये आरोपीचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;