Jammu-Kashmir : कुपवाडात सुरक्षा दलाच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत

Jammu-Kashmir : कुपवाडात सुरक्षा दलाच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान गुरुवारी कुपवाडात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाला यश आले आहे. सुरक्षा दलाने ठार केलेल्या दहशतवाद्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाची कारवाई सुरू होती. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. मोहिमेदरम्यान एक एके रायफल, दोन हातबॉम्ब, चार एके मॅगझिन, दारूगोळा आणि इतर युद्धसदृश साहित्य जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोलाब भागात मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली होती. यानंतर बुधवारी या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. तर बांदीपोरा जिल्ह्यातील केत्सून जंगलात मंगळवारी एका दहशतवाद्यालाही ठार करण्यात आले. बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;