‘तुझ्यामुळे प्रत्येक दिवस…’; लेकीच्या वाढदिवसानिमित्त आलियाची भावनिक पोस्ट

‘तुझ्यामुळे प्रत्येक दिवस…’; लेकीच्या वाढदिवसानिमित्त आलियाची भावनिक पोस्ट

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा दोन वर्षांची झाली. 6 नोव्हेंबर रोजी राहाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे. राहाचा जन्म झाल्यानंतर काही आठवड्यांनी काढलेला फोटोसुद्धा तिने चाहत्यांसोबत शेअर केला. या फोटोमध्ये आलियाने तिच्या कुशीत चिमुकल्या राहाला धरलंय आणि रणबीर अत्यंत प्रेमाने त्याच्या मुलीला न्याहाळताना दिसतोय. आलियाने हा फोटो पोस्ट करताच क्षणार्धात तो व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला.

आलियाची पोस्ट-

‘दोन वर्षे पूर्ण झाली.. आणि मला असं वाटतंय की मी ती वेळ पुन्हा जगावं जेव्हा तू फक्त काही आठवड्यांची होतीस. पण कदाचित पालक झाल्यानंतर प्रत्येकाला असंच वाटतं की तुमच्या बाळाने कायम बाळच राहिलं पाहिजे. आमच्या आयुष्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. तुझ्यामुळे प्रत्येक दिवस मला बर्थडे केकसारखा वाटतो,’ अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

राहाची आजी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनीसुद्धा आलिया, रणबीर आणि नातीचा सुंदर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरची बहीण आणि राहाची आत्या रिद्धिमा कपूर सहानीनेही तिच्यासोबत फोटो पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. आलिया आणि रणबीरने एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलियाने राहाला जन्म दिला.

राहाच्या जन्मानंतर रणबीर आणि आलियाने तिचा चेहरा सर्वांना दाखवणं टाळलं होतं. त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर गेल्याच वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर राहाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. राहाचे डोळे हुबेहूब रणबीरचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखेच असल्याचं नेटकरी म्हणाले होते.

मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्याविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती, “माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;