माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी

माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी

भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदार राजाला धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बस, जास्त आवाज करू नको, अशा शब्दांत प्रशांत बंब यांनी मतदाराला धमकी दिल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात महायुतीकडून प्रशांत बंब विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत आहे. वेरूळ येथे प्रचार सभा असताना प्रशांत बंब यांनी ही धमकी दिली. प्रशांत बंब यांना वेरूळ येथील ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. आमदार म्हणून 15 वर्षे काय केले ते आधी सांगा. मग मते मागा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशांत बंब यांचा पारा चढला.  सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी शेतकऱयांचे प्रश्न, पशुवैद्यकीय दवाखाना, मका संशोधन पेंद्र, तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न यावर प्रश्न उपस्थित केल्याने बंब यांचा तीळपापड झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;