महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा

महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा

बीड जिह्यातील आष्टी मतदारसंघात महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप आणि अजित पवार गटात हा वाद उफाळून आला असून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. आष्टी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश धस हे लवकरच शरद पवार यांच्या तुतारीचा प्रचार करताना दिसतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आष्टी मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपने सुरेश धस यांना रिंगणात उतरवले, तर अजित पवार गटाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिली. एकाच मतदारसंघात दोन-दोन उमेदवार देण्यात आल्याने महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे तर आष्टीत तुतारीची  जबरदस्त हवा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;