लोकलमध्ये अश्लील कृत्य करणारा अटकेत 

लोकलमध्ये अश्लील कृत्य करणारा अटकेत 

लोकल प्रवासात महिलेला पाहून अश्लील कृत्य करणाऱ्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. राहुल किसन जगधने असे त्याचे नाव आहे. तक्रारदार महिला या दहिसर येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी त्या सांताक्रूझ स्थानकात आल्या. त्याने नालासोपारा येथे जाणारी स्लो लोकल पकडली. महिलांच्या डब्यातून त्या प्रवास करत होत्या. लोकल पावणे एक वाजता मालाड स्थानकात आली. तेव्हा एक जण त्याच्या समोरील सीटवर येऊन बसला. तो तक्रारदार यांना वेगळ्या नजरेने पाहत हावभाव करत होता. तक्रारदार या घाबरल्या. त्याने मुलाला पह्न करून दहिसर स्थानकात बोलावले.

त्यानंतर त्या सीटवरून उठून दुसऱ्या सीटवर जाऊन बसल्या. कांदिवली स्थानकात लोकल पोहचण्यापूर्वी त्याने महिलेला पाहून अश्लील कृत्य केले. त्या कृत्यामुळे तक्रारदार या घाबरल्या. त्याने शेजारी बसलेल्या एका महिला प्रवाशाची मदत घेतली. लोकल बोरिवली स्थानकात आल्यावर तो निघून गेला. तक्रारदार महिलेने घडल्या प्रकाराची माहिती मुलाला सांगितली. त्यानंतर महिलेने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;