FIR Against Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

FIR Against Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी भाजपने पश्चिम बंगाल येथील सॉल्ट लेक येथे ईझेडसीसी येथे एक कार्यशाळा आयोजित केली होती. येथेच मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते की, ”येथील एक नेता म्हणाला होता की, इथं 70 टक्के मुस्लिम, 30 टक्के हिंदू आहेत. आम्ही यांना कापून भागीरथीमध्ये बुडवून टाकू.”

ते पुढे म्हणाले, ”तुम्ही कापून भागीरथीत फेकून द्यायला. मात्र एक दिवस असा येईल, जेव्हा आम्ही तुम्हाला कापून भागीरथीत नाही, तुमच्या जमीनीवर फेकून देऊ. जर तुम्ही आमच्या झाडाचे एक फळ तोडले तर आम्ही तुमच्या झाडावरची चार फळे तोडून टाकू.”

मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले की, ”म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की, आम्ही काहीही करू शकतो, काहीही. आम्हाला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे जे पुढे येऊन लढतील. छाती वर करून ‘गोळी मारा, बघू किती गोळ्या आहेत’ असे म्हणणारे कार्यकर्ता आम्हाला हवेत.”

दरम्यान, सभेत असे वक्तव्य करणे आता मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. कारण त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात विधाननगर दक्षिण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;