दुचाकीला वाचवण्याच्या नादात रिक्षा ट्रकला धडकली, अपघातात 10 जणांचा मृत्यू

दुचाकीला वाचवण्याच्या नादात रिक्षा ट्रकला धडकली, अपघातात 10 जणांचा मृत्यू

दुचाकीला वाचवण्याच्या नादात उत्तर प्रदेशातील हरदोई भीषण अपघात घडला. रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. अपघात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त रिक्षा कटरा बिल्हौर मार्गावरुन बिलग्रामच्या दिशेने येत होती. यावेळी एक दुचाकीवाला अचानक समोर आल्याने त्याला वाचवण्यासाठी रिक्षाचालकाने कट मारला. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला रिक्षा धडकली आणि पलटी झाली. रिक्षात 15 प्रवाशी होते.

प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आसपास शेतात काम करणारे स्थानिक लोक धावत आले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघातात रिक्षातील 10 प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;