सनी देओल-डिंपल कपाडियाच्या अफेअरबद्दल जेव्हा अमृता म्हणाली, “नात्याचं भविष्य..”

सनी देओल-डिंपल कपाडियाच्या अफेअरबद्दल जेव्हा अमृता म्हणाली, “नात्याचं भविष्य..”

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा सनी देओल त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. सनीने 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर सनीचं नाव अभिनेत्री अमृता सिंगशी जोडलं गेलं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सनीने लंडनस्थित पूजाशी गुपचूप लग्न केलं होतं. इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वीच त्याने पूजाशी लग्न केलं होतं आणि त्याने ही बातमी सर्वांपासून लपवली होती. जेव्हा अमृताला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने माघार घेण्याचं ठरवलं. पण त्यानंतर लगेचच सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावेळी डिंपलसुद्धा विवाहित होती. मात्र ती आणि राजेश खन्ना वेगवेगळे राहत होते.

सनी आणि डिंपल यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. सेटवरील ब्रेकदरम्यान या दोघांमधील जवळीक सर्वांना स्पष्ट दिसू लागली होती. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, असा अनेकांना संशय होता. इतकंच काय तर या दोघांच्या गुपचूप लग्नाच्याही चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावर दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. सनीची एक्स गर्लफ्रेंड अमृताने डिंपलसोबतच्या त्याच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. “माझ्या मते ती तिच्या वाटणीचा केक खातेय. तिला त्यात गमावण्यासारखं काहीच नाही आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिला आयुष्याच्या ज्या टप्प्यात एका प्रेमाची गरज होती, ते तिला मिळतंय. त्यामुळे या नात्याचं भविष्य काहीच नसलं तरी काय फरक पडतंय? तुम्ही आधीच तुमचं आयुष्य जगला आहात आणि आतासुद्धा तुम्ही तुमच्या नात्यात खुश आहात”, असं अमृता म्हणाली होती.

डिंपल आणि सनीच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत वाऱ्याच्या वेगाने पसरू लागल्या होत्या. डिंपलच्या दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी त्याला ‘छोटे पापा’ असं म्हणू लागल्या होत्या. इतकंच काय तर डिंपलची बहीण सिंपल सनी देओलची कॉस्च्युम डिझायनर झाली होती. या तिघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. पूजाशी विवाहित असतानाही सनी तिला घटस्फोट देऊन डिंपलशी लग्न करायला तयार होता. पण पूजाने दोन्ही मुलांसोबत घर सोडण्याची धमकी दिल्याचं म्हटलं जातं. अखेर मुलांखातर सनीने डिंपलसोबतच्या रिलेशनशिपला पूर्णविराम दिला. पण यानंतरही 2017 मध्ये या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परदेशात हे दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन फिरताना दिसले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;