बाळ कधी होणार? प्रश्नावर प्रिया बापटचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘मी आता थकलीये कारण…’

बाळ कधी होणार? प्रश्नावर प्रिया बापटचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘मी आता थकलीये कारण…’

अभिनेत्री प्रिया बापट ही मराठीसोबतच हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये विविध भूमिका साकारताना दिसते. प्रिया बापट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. प्रसिद्धी झोतात असल्यामुळे प्रिया बापट हिच्या फक्त प्रोफेशलच नाही तर, खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहे. तरी देखील दोघांनी बाळ नाही… मुलबाळ नं झाल्याने बरेचदा प्रिया आणि उमेशला ट्रोल देखली केलं जातं.

अशात नुतकाच झालेल्या मुलाखतीत, बाळ कधी होणार? या सतत विचारल्या जाण्यावर प्रश्नावर प्रियाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली आहे. पण मला मुलं नाही… जे काही असेल तो माझा आणि माझ्या नवऱ्याचा खासगी निर्णय आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

पुढे प्रिया बापट म्हणाली, ‘मला वाटलं वयाच्या 42 व्या वर्षी मुल जन्माला घालायचं आहे. तर मी तेव्हा मुलाला जन्म देईल. तेव्हाही नाही वाटलं तर नाही देणार… त्यामुळे लोकांनी हा प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे… लग्न झाल्यानंतर जोडप्याचं मुल पहायचं आहे… अशी अनेकांचा अपेक्षा असते. पण प्रत्येक जोडप्याची अपेक्षा ही मुल होणंच नाहीये ना!…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

चाहत्यांबद्दल काय म्हणाली प्रिया बापट?

प्रिया म्हणाली, ‘अनेकांचं आमच्यावर प्रेम आहे. म्हणून त्यांच्याकडून हे प्रश्न येत असतात. पूर्वी मला या प्रश्नांचा राग यायचा. पण आता मला लोकांची मानसिकता समजायला लागली आहे. शिवाय लग्न झाल्यानंतर जोडप्याने मूल जन्माला घातलं पाहिजे हा अधीलखीत नियम मला पटतच नाही. मुलाला जन्म द्यायाचा की नाही हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

प्रिया बापट हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘टाईम प्लीज’, ‘वजनदार’, ‘टाईमपास 2’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘आम्ही दोघी’ अशा अनेक सिनेमांमध्ये प्रियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील प्रिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;