सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर सलमान खानच्या एक्सगर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘त्याला मारून टाकलंय आणि…’

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर सलमान खानच्या एक्सगर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘त्याला मारून टाकलंय आणि…’

Sushant Singh Rajput Case: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली. यापूर्वी तिने बिश्नोई गँगशी पंगा घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि आता तिने आणखी एक मोठं वक्तव्य केले आहे. सोमी अली हिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिनेत्रीचा एक स्क्रिनशॉर्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र सोमी अली हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच सोनी अली हिने रेडिटवर आस्क मी सेशन ठेवलं होतं. जेथे सोमी हिने बिश्नोई समाजासोबत सलमान खान याचे वाद आणि 90 च्या दशकातील तिच्या आणि सलमान खान याच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. एवढचं नाही तर, सोमीने सुशांतने स्वतःला संपवलं नाही तर, त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. शिवाय अभिनेत्रीने डॉक्टरांचं नाव घेत मोठा खुलासा केला आहे.

आस्क मी सेशन दरम्यान एका युजरने सोमी, सुशांतबद्दल तू काय विचार करते? असा प्रश्न विचार करते? असा प्रश्न विचारला. यावर सोमी म्हणाली, ‘ज्याप्रमाणे बॉलिवूडने सुशांतला बाहेरचा रस्ता दाखवला ते सत्य फार निराशाजनक आहे. सुशांतची हत्या करण्यात आली आहे आणि त्याला आत्महत्येचं रुप देण्यासाठी सुशांतच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये बदल करण्यात आले. एम्सचे डॉ.सुधीर गुप्ता यांना विचारा ज्यांनी रिपोर्ट बदलले आणि का? ‘ या गोष्टीचा स्क्रिनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अन्य एका रेडीट युजरने सोमीला विचारलं, ‘भूतकाळातील नात्यांकडे कशी पाहतेस? आयुष्याच्या या टप्प्यात कोणत्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेस?’ यावर सोमी अली म्हणाली, ‘जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत, जिया खान, रवींद्र पाटील…. गुगलवर सर्च करा त्यांच्यासोबत काय झालं होतं…’ असं देखील सोमी म्हणाली.

त्यानंतर एका रेडीट युजरने ‘बॉलिवूडचा निरोप का घेतला?’ असा प्रश्न विचारला. यावर सोमी म्हणाली, ‘सलमान खान याच्या एक नाही 8 नाईट स्टँड्सला कंटाळली होती. मला रोज होणारा शारीरिक आणि मानसिक छळ मान्य नव्हता. मी माझ्या बॉयफ्रेंडला अशा वेळी सोडलं जेव्हा त्याच नाव ऐश नावाच्या मुलीसोबत जोडू जाऊ लागलं…’ असं देखील सोमी म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;