दिव्या भारतीला उडी मारताना पाहिलं…, 21 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूचा खुलासा, धक्कादायक आहे सत्य

दिव्या भारतीला उडी मारताना पाहिलं…, 21 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूचा खुलासा, धक्कादायक आहे सत्य

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्या निधनानंतर फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली होती. दिव्या भारती हिच्या मृत्यूला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील आजही अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असतात. दिव्या भारती हिचं निधन वयाच्या 19 व्या वर्षी झाली. मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर पती साजिद नाडियाडवाला यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. पण गुड्डी मारूती हिने धक्कादायक दावा करत साजिद नाडियाडवाला आरोपी नसल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत गुड्डी मारूती हिने दिव्या भारती हिच्या मृत्यूबद्दल मोठा दावा केला आहे. ‘दिव्या चांगली मुलगी होती. पण कायम अस्वस्थ असायची… दिव्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आजच आपला शेवटचा दिवस आहे अशी जगायची… तेव्हा ‘शोला और शबनम’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. 5 एप्रिल रोजी दिव्याचं निधन झालं आणि 4 एप्रिलला माझा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही पार्टी करत होतो…’

‘पार्टीमध्ये गोविंदा, दिव्या, साजिद आणि अन्य मित्र देखील होते. दिव्या पार्टीमध्ये सर्वांसोबत बोलत होती. पण मला ती नाराज वाटत होती. तिला सकाळी आउटडोर शुटसाठी जायचं होतं. पण शुटला जाण्याची दिव्याची इच्छा नव्हती….’ असं गुड्डी मारूती म्हणाली.

यावेळी गुड्डी मारूती हिने विचित्र घटनेचा देखील उल्लेख केला. ‘दिव्या पाचव्या मजल्यावर राहायची. एका रात्री मी आयस्क्रिम घेण्यासाठी खाली उतरली. मागून मला कोणातरी आवाज देत होतं. मी वर पाहिल्यानंतर दिव्या मला बाल्कनीमध्ये बसलेली दिसली. मी तिला सांगितल हे सेफ नाही, तेव्हा दिव्या मला म्हणाली, ‘काही होणार नाही. मला उंचीची भीती वाटत नाही…”

‘साजिद याची कार आली की नाही हे पाहण्यासाठी दिव्या खाली वाकली आणि पाचव्या मजल्यावरून खाली पडली. तिला खाली पडताना डिझायनर नीता लुल्ला हिने देखील पाहिलं… दिव्याच्या निधनानंतर तिची आई पूर्णपणे कोलमडली होती. साजिदवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला होता. घटना घडली तेव्हा साजिद देखील तिथेच होता…’ असा धक्कादायक खुलासा गुड्डी मारूती हिने केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;